महाराष्ट्रातील सरपंचांचे 'मनरेगा' व ग्राम आपत्ती निवारण समित्या तयार करण्यासाठी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनातून प्रशिक्षण

पुणे ,२४ सप्टेंबर २०२० - महात्मा फुले समाज सेवा मंडळ (MPSSM) यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्फेयर इंडिया' तर्फे महाराष्ट्रात आयोजित केलेल्या १२ जिल्ह्यांतील सरपंचांसाठी विविध प्रकारच्या प्रशिक्षण सत्रांचे उदघाटन महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती सौ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रशिक्षण सत्रांमध्ये सरपंचांना सद्यःस्थितीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेच्या (मनरेगा) अंमलबजावणीचे शिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षणामध्ये सुमारे ४६ दशलक्ष लोकसंख्येचा अप्रत्यक्ष फायदा करून देण्यासाठी ग्रामीण पातळीवर आपत्ती निवारण समित्यांची स्थापना करणे, भविष्यातील कोणत्याही आपत्कालीन परिस्थिती व आपत्तींसाठी गावे अधिक सक्षम करणे, इ. बाबींवरही भर देण्यात येणार आहे.
कार्यक्रमातील प्रवक्त्यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण रोजगार आणि स्थलांतरित कामगार यावर कोव्हीड-१९ महामारीमुळे झालेला परिणाम तसेच आपत्ती व्यवस्थापन व विकास कार्यात महिलांच्या सहभागाला कसे प्राधान्य द्यायचे यासारख्या महत्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित केले.

MPSSM व 'स्फेयर इंडिया'तर्फे आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारला २०० पेक्षा अधिक सरपंच व नागरी समाज संस्था उपस्थित होत्या.
उपस्थितांचे स्वागत करताना स्फेयर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत महाजन म्हणाले,'' सध्याच्या परिस्थितीत मनरेगा अंतर्गत 'DRR (Disaster Risk Reduction)' सारखा उपक्रम राबवण्याची ही पहिलीच वेळ आहे. याद्वारे केवळ कोविड आणि इतर साथीच्या रोगांची तयारी करण्यातच नव्हे पण रोजगार उपलब्ध करून देण्यातही मदत होईल. इतर राज्येही यातून धडे घेतील. महाराष्ट्रातील खेड्यांमधील आपत्ती जोखीम कमी होण्यास हे बरीच साथ देईल”.

महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे प्रमुख कार्यवाह श्री. प्रमोद झिंगजाडे ,'यशदा'चे आपत्ती व्यवस्थापन केंद्र संचालक कर्नल विश्वास सुपाणेकर (निवृत्त) ,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्यावतीने कार्यकारी संचालक मेजर जनरल मनोजकुमार बिंदल यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी उपसभापती,महाराष्ट्र विधानपरिषद नीलमताई गोऱ्हे यांनी आपत्ती व्यवस्थापनातील महिलांच्या भूमिकेबद्दल आणि कॉव्हिड -१९ आजाराला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या प्रयत्नांबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या, ''आपत्ती व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. स्त्रियांसोबतच्या भेदभावामुळे त्यांना कधीच निर्णय प्रक्रियेत स्थान दिले गेले नाही. आणि म्हणूनच, हे प्रक्षिशण त्यासाठी उपयोगी ठरेल. महाराष्ट्र शासनाने महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्याची विनंती करून सर्वसाधारण ठराव सादर केला आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या गरजा समजून घेण्यासाठी भविष्यातही असे उपक्रम घेण्यात येतील.आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरी संस्थांनी उपजीविका निर्मितीसाठी शमन योजना तयार करावी व ती सरकारला दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. सोबतच 'जॉब कार्ड' उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा मदत करण्याचे आणि कोविड -१९ नंतर लोकांना मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत राहील असेही आश्वासन त्यांनी दिले .
प्रभावी आपत्ती व्यवस्थापन समिती तयार करताना सामुदायिक नेतृत्व आणि प्रशिक्षित सामाजिक गट निर्माण होण्यास मदत होते. यामुळे समाजातील प्रत्येक स्तरावरील घटकास समान मालकीहक्क मिळतील. तसेच त्यांना सक्रिय भागीधारकाचा दर्जाही प्राप्त होऊ शकतो.

स्फेयर इंडियाचा अ‍ॅडव्होकसी मॅनेजर परितोष मुळे यांनी समारोप केलेल्या वक्तव्यात प्रशिक्षणाचे काम लवकरच सुरू होईल असे सांगून पुढील योजना विस्तृत केली व त्याविषयीची माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध करुन दिली जाईल असे नमूद केले.

कोविड -१९ दरम्यान मनरेगा अंतर्गत DRR चे स्वरूप: MPSSM आणि NIDM च्या पाठिंब्याने स्फेयर इंडिया आयोजित महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमधील सरपंचांच्या प्रशिक्षण सत्रांची ही मालिका आहे, ज्यामध्ये ६०० सरपंच मनरेगाची प्रभावीपणे अंमलबजावणी करतील आणि आपत्ती निवारक ग्राम समितीची तयारी करतील ज्याद्वारे ४६ दशलक्ष लोकांना लाभ मिळेल. या सत्रांत २४ अधिवेशने घेण्यात येतील, त्यातील १२ सरपंचांच्या प्रशिक्षणावर तर इतर १२ आपत्ती निवारक ग्राम समिती तयार करण्यावर भर देतील.

स्फेयर इंडिया हा भारतातील मानवतावादी एजन्सींची राष्ट्रीय पातळीवरील संयुक्त पक्ष आहे. यातील सदस्यांमध्ये भारत, युएन संस्था, आयएनजीओ, एनजीओ नेटवर्क आणि राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था इ. प्रमुख नोडल संस्थांचा समावेश आहे. स्फेयर इंडिया गुणवत्ता व उत्तरदायित्वासाठी सहयोगी प्रक्रियेद्वारे आंतर एजन्सी समन्वय, प्रशिक्षण व क्षमता वाढवणे, सहयोगी पुरस्कार (Collaborative Advocacy) व माहिती ज्ञान व शिक्षण व्यवस्थापन सुलभ करणे यावर भर देतो.

अधिक माहितीसाठी संपर्क करा:
Aparna Bhalla ,Sphere India
Phone Number: +91 9999677275
Email- aparna@sphereindia.org.in
 
Top