महिलांनी भाषेचा विचार न करता आपल्या भावना योग्य प्रकारे लिहाव्यात

मुंबई,दि.२५ सप्टेंबर २०२०- साहित्य मंजिरी या डिजिटल महिला साहित्य संमेलनास आज सुरुवात झाली. या महिला साहित्य संमेलनाचे आयोजन स्त्री आधार केंद्र, मुंबई मराठी पत्रकार संघ आणि महिला आर्थिक विकास महामंडळ या संस्थांतर्फे साहित्य 'मंजिरी' या करण्यात आले आहे.

   या साहित्य संमेलनाचे आज उदघाटन संमेलन अध्यक्ष प्रख्यात लेखिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते झाले असून डॉ.नीलम गो-हे, उपसभापती महाराष्ट्र विधानपरिषद या स्वागताध्यक्ष होत्या. तसंच मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष श्रीमती ज्योती ठाकरे या मान्यवरांनी देखील उद्घाटन सत्रात सहभाग घेऊन विचार मांडले.

प्रत्येक महिलेने आपल्या परीने व्यक्त होणे गरजेचे 

सर्वांच्या साथीने सर्वांचा विकास होणे आवश्यक असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे उपसभापती विधान परिषद यांनी महाराष्ट्रातील पहिले ऑनलाइन महिला साहित्य संमेलन संमेलनाचे उद्घाटन करताना आपल्या उद्घाटनपर भाषणामध्ये सांगितले.शाश्वत विकासाची उद्दिष्टे आणि बीजिंग+ २५ वर्ष याबाबतही त्यांनी आपले विचार प्रकट केले. महिलांचा विकास हा सर्वांच्या साथीने आणि सर्वांच्याबरोबर होणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक असणारी इच्छाशक्ती महिलांच्यामध्ये आपण निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.हे साहित्य संमेलन हे महाराष्ट्रातील पहिले ऑनलाइन साहित्य संमेलन होते. अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले होत्या. त्यांनी आपले विचार मांडताना महिलानी भाषेचा विचार न करता आपल्या प्रत्येक भावना योग्य प्रकारे लिहिल्या पाहिजेत असे सांगितले. या भावना त्या आपल्या व्यक्तिगत असल्यामुळे याचा समाज मनावर नक्की परिणाम होतो असे त्याने सांगितले. त्यामुळे प्रत्येक महिलेने आपल्या परीने व्यक्त होणे गरजेचे आहे आणि त्या भावना एक आपला अमूल्य ठेवा आहे याचाही विचार करावा असे सांगितले.

    स्त्री आधार केंद्र,मुंबई मराठी पत्रकार संघ व महिला आर्थिक विकास महामंडळाने आयोजित केलेले हे पहिलेच डिजिटल महिला साहित्य संमेलन आहे. हे पहिले डिजिटल साहित्य संमेलन ना.डॉ.गोऱ्हे हे यांच्या नावावर राहील असे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी सांगितले.

  उदघाटन कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्रीमती उत्तरा मोने यांनी केले.
 
Top