माझ्यावर विश्‍वास टाकुन जबाबदारी सोपविली ती प्रामाणिकपणे पार पाडू

पंढरपूर (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश संघटकपदी कु. चारुशिला कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील,उपमुख्यमंत्री अजित पवार , राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या निमंत्रक खा.सुप्रिया ताई सुळे यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा कु. सक्षणा सलगर यांनी नुकतेच या निवडीचे पत्र कु. चारुशिला कुलकर्णी यांना दिले.

     या निवडीनंतर बोलताना राष्ट्रवादी युवती काँग्रेस नुतन प्रदेश संघटक कु.चारुशिला कुलकर्णी म्हणाल्या की, पक्ष बळकटीसाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे आणि देशाचे नेते शरदचंद्र पवार यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यास जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके,राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सतत प्रयत्नशील राहु. वरिष्ठांनी माझ्यावर विश्‍वास टाकुन जी जबाबदारी सोपविली आहे ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू ,असे मत व्यक्त केले.
 
Top