पंढरपूर - आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त(birthday) आमदार प्रशांत परिचारक यांचेवतीने पंढरपूर नगर परिषदेच्या भक्तीसागर (६५ एकर) येथील कोवीड केअर सेंटरमधील १०० रुग्णांना फळे वाटप करण्याचा कार्यक्रम पंढरपूर मर्चंट सह.बँकेचे चेअरमन नागेश भोसले व उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव यांचे हस्ते करण्यात आला.


या कार्यक्रमासाठी नगरपरिषद पक्षनेते गुरुदास अभ्यंकर,आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, नगरसेवक कृष्णा वाघमारे,मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ बी के धोत्रे,उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, शहर भाजपाचे माजी अध्यक्ष बादलसिंह ठाकूर,शिरीष कटेकर व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.


तसेच पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड रुग्णांना फळे वाटप करण्याचा कार्यक्रम खर्डीचे उपसरपंच प्रणव परिचारक व उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव यांचे हस्ते करण्यात आला.


प्रणव परिचारक यांनी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशवासियांसाठी सेवा सप्ताहाचे आयोजन करुन विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत . आज कोवीड रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम करुन त्यांच्या आरोग्याला पोषक अशी फळे देण्यात येत आहेत. सर्वांच्या आशीर्वादाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिर्घायुष लाभावे अशा शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव यांनी केले. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र डांगे,अक्षय वाडेकर, शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीमती जयश्री ढवळे, डॉ प्रसन्न भातलवंडे, डॉ प्रदीप केचे,शहर भाजपा माजी अध्यक्ष बादलसिंह ठाकूर , दशरथ काळे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top