कुर्डुवाडी,
(राहुल धोका) १९/०९/२०२०-कुर्डुवाडी शहरात माझे कुटुंब ,माझी जबाबदारी मोहिमेस सुरवात झाली आहे. जिल्ह्यासह शहरी व ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी स्वत:ची व स्वत:च्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.नागरिकांमध्ये आरोग्य साक्षरता निर्माण व्हावी यासाठी ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी ’ या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे, आवाहन कुर्डुवाडी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.


नगराध्यक्ष समीर मुलाणी,मुख्याधिकारी चंदनदास कोल्हे ,आरोग्य सभापती वनिता सातव,सर्व नगरसेवक तसेच स्वच्छता निरिक्षक तुकाराम पायगण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात माझे कुटुंब ,माझी जबाबदारी या मोहिम सुरु करण्यात आली आहे .


या मोहिमेत नोडल अधिकारी कोमल वावरे, पर्यवेक्षक अतुल शिंदे ,अभिजीत पवार हे काम पहात असून १२ टिम यासाठी नियुक्त करण्यात आल्या आहेत.

शहरातील पाच वार्डातील २५००० नागरिकांचे २५ आक्टोंबरपर्यंत तापमान ,आँक्सीजन तपासणी केली जाणार आहे.मधुमेह, हृदयविकार,किडनी संबंधित आजार तसेच सर्दी खोकला सदृष्य रुग्णांना कोविड तपासणी करण्यासाठी सुचना दिली जात आहे.

कुर्डुवाडी शहरातील कोरोनाची साखळी तोडण्या साठी प्रत्येक नागरिकाने मास्क वापरावा तसेच पंचायत समिती विठ्ठल सभागृहात कोरोना रॅपिड अँटिजन तपासणी मोफत चालु आहे ती करुन घ्यावी असे आवाहन तुकाराम पायगण स्वच्छता निरिक्षक यानी केले आहे.

पंचायत समिती येथे ६३ जणाचे रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली असून यात १३ व्यक्ति पाॅझिटिव्ह आढळल्या आहेत.
 
Top