कुर्डुवाडी,(राहुल धोका),दि २९/९/२०२०-
महाराष्ट्र शासनाने व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर व उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डुवाडी यांच्या आदेशाने कुर्डुवाडी नगरपरिषद क्षेत्रात कोविड-19 नियंत्रणासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी "माझे कुटुंब माझी जबाबदारी" कोविड मुक्त महाराष्ट्र ही मोहीम नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर भूमकर व स्वछता निरीक्षक तुकाराम विष्णू पायगण यांच्या आधिपत्य खाली करण्यात आली नगरपालिकेने संपूर्ण शहरामध्ये १२ टीम तयार केलेल्या आहेत .


कुर्डुवाडी शहरातील नागरिकांना टीमचे कर्मचारी आपल्या घरी माहिती घेत असताना त्यांना अचूक द्यावी व शहरातील नागरिकांनी राष्ट्रमाता जिजाऊ शाळा क्र. 3 येथे स्वतःहून रॅपिड टेस्ट करून घ्यावी - समीर भूमकर ,मुख्याधिकारी नगरपरिषद कुर्डुवाडी
  

 सदरील टीममध्ये कुटूंबातील सर्व व्यक्तींची माहिती, थर्मामीटर ,ऑक्सिमीटर ताप sp o2 95 पेक्षा कमी, co-morbid कोमाँरबीड कंडिशन या तिन्ही पैकी कोणतीही दोन लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तीस हाय रिस्क संबोधून त्वरित फिवर ट्रीटमेंट सेंटर, कोविड केअर सेंटरला संदर्भित करावे तरी सादर पथकामध्ये परिवेक्षक म्हणून अतुल शिंदे व अभिजित पवार हे काम पाहत आहेत. नोडल अधिकारी म्हणून कोमल वावरे हे काम पाहत आहेत. १ ते १२ टीममध्ये सर्व विभाग प्रमुख संवर्ग कर्मचारी ठेकेदार, स्वछतादूत आरोग्य कर्मचारी सर्व विभागातील कर्मचारी काम करीत आहेत सर्व टीमचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
 
Top