या पाचही प्रवेशद्वारावरील टोलच्या दरात पाच ते पंचवीस रुपयांची वाढ

मुंबई, २६/०९/२०२०- १ ऑक्टोंबर २०२० पासून मुंबईच्या मुलुंड वाशी दहिसर एरोली आणि एलबीएस या पाचही प्रवेशद्वारावरील टोलच्या दरात पाच ते पंचवीस रुपयांची वाढ होणार आहे मुंबईत ५५ उड्डाण पुलांचा खर्च भरून काढण्या साठी या पाचही टोल नाक्यांची निर्मिती करण्यात आली होती त्यासाठी २००२ ते २०२७ अशी कालमर्यादा निश्चित केली होती.राज्य रस्ते विकास महामंडळ सोबत झालेल्या करारानुसार टोलच्या दरात दर तीन वर्षांनी वाढ होणार आहे.

त्याप्रमाणे आता लहान वाहनांच्या टोल दरात पाच रुपयांची तर वीस पँसेंजरच्या बस दरात दहा रुपये आणि मोठ्या बस,ट्रकच्या दरात २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीच्या विरोधात वाहनचालक आंदोलन करणार असल्याचे या वाहनधारकांच्या संघटनेने म्हटले आहे तर नागरिकांतून ही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे
 
Top