भाजी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या मोबाइलची चोरी 

पंढरपूर - पंढरपूर शहरातील नवीपेठ येथील भाजी मंडईत भाजी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या मोबाइलची चोरी होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मोबाईल चोरांना पकडण्यात पोलिसांना यश मिळत नव्हते त्यामुळे पोलिस मोबाईल चोरांना पाठीशी घालतात अशी लोकांमध्ये चर्चा होत होती एकीकडे पोलिस मोबाईल चोरांच्या शोधात असताना त्यांना मोबाईल चोरी करण्यासाठी बाहेर गावावरून येवून चोरी करायची हि पध्दती राबवणार्या टोळीबाबत संशय होता.

महिलेसह (mobile thief) तिघांना मोबाईल चोरी करताना घेतले ताब्यात

याबाबत तक्रार पोलिसांना येताच पोलिसांंनी नजर ठेवून बाहेर गावातुन कारमधून येवून चोरी करणार्या एका महिलेसह (mobile thief) तिघांना मोबाईल चोरी करताना ताब्यात घेतले. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसां कडून मिळालेल्या माहितीनुसार विकी हिरालाल गुजर, वय ३२ ,राहणार जुना कराड नाका ते चार जून रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास येथील भाजी मंडईमध्ये गेले होते .त्याठिकाणी त्यांचा पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीला चोरला त्यांच्याप्रमाणे त्यादिवशी अन्य चौघांचे मोबाईलही चोरीला गेले होते .या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण पवार तपास करत आहेत. मोबाईल चोरलेले अन्यत्र विक्री करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या मोबाईल चोरी प्रकरणात अटकेत असलेल्या तिघांविरुद्ध सातारा, सोलापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत .

ही कारवाई पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहरचे पोलीस निरीक्षक अरुण पवार , सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरज हेंबाडे ,बिपिन ढेरे, पोलीस नाईक गणेश पवार, प्रसाद औटी,सिद्धनाथ मोरे, अभिजीत कांबळे, भाग्यश्री घाडगे, सविता भोजने यांनी केेली. आरोपी महिला व इतर दोघांकडून चार मोबाईल जप्त केले असून माढा तालुक्यात दोन मोबाईल सापडलेले आहेत .सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .मोबाईल चोरीला गेलेल्या व्यक्तींनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी केले आहे.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नागरिकां मधून समाधान व्यक्त केले जात आहे .अशीच सुरक्षितता यापुढेही प्रदान केली जाईल अशी आशा आहे.
 
Top