बचतगट कर्ज घेताना कर्जातून विमा रक्कम काढली जाते

पंढरपूर - कोरोनाच्या संकटकाळात बचतगट हप्ते भरणे अश्यक्य झाले आहे.महिलांनी बचत गट कर्ज घेताना आपल्या कर्जातून विमा रक्कम काढून घेतली जात असते.तो विमा हा संकट आल्यावर लागू केला जातो, परंतु विमा रक्कम काढून घेऊन त्याचे सर्टिफिकेट मिळाले नाही त्यामुळे या कोरोनाच्या परिस्थितीत विमा लागू करणे अश्यक्य झाले आहे. व्यवसाय बुडाले, साहित्याची नासाडी झाली यामुळे महिलांना आता नव्याने व्यवसाय करणे अवघड झाले आहे. तरी सरकारने यामध्ये योग्य मार्ग काढून अडचणीत आलेल्या महिलांना दिलासा देऊन नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करावा अशा मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे त्यामुळे हे कर्ज माफ करून मिळावे अशी मागणी सरकारकडे करण्यात येणार आहे त्यासाठी मनसेे च्यावतीने आज मंगळवारी दि २९/०९/२०२० रोजी पंढरपूर येथील तहसील कार्यालय येथे बचत गटांच्या महिलांचा मोर्चा काढण्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पंढरपूर शहर आणि तालुक्यातील सर्व महिला आणि सामाजिक कार्यकर्ते यानी येथील शिवाजी चौक येथे सकाळी १०.०० वाजता उपस्थित राहावे असे आवाहन मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी केले आहे.

महिलांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सहकार्य करावे

मागील या अनेक वर्षांपासून ही बचत गट वसुली अतिशय काटेकोरपणे केली आहे.सध्या आर्थिक परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे कर्जमाफी एवढाच एक मार्ग शिल्लक असून या मागणीसाठीच्या या मोर्चात विविध राजकिय महिला नेते मंडळी यांनीही आपली उपस्थिती दाखवून महिलांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन दिलीप धोत्रे आणि पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी केले आहे.
 
Top