कुर्डुवाडी,(राहुल धोका),२८/०९/२०२०- पंढरपूर येेथील एचआयव्हीग्रस्त तरुणाच्या विवाहाने नवी उमेद जागवली आहे.आज दि २८/०९/२०२० रोजी दुपारी या जोडप्याचा विवाह सोहळा संपन्न झाला.


उमिदच्या अध्यक्षा डाॅ.ब्रम्हाकुमारी प्रमिलाबेन दिदी यांच्या आशीर्वादाने हा विवाह सोहळा कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन असल्यामुळे साध्या पध्दतीने पार पडला.

अनाथ कन्या चि.सौ.कां.सुवर्णा हीचे कन्यादान श्रीगणेश चतुर्थी उपक्रमचे संस्थापक अध्यक्ष बालाजी लुक्कड व सौ.भारती बालाजी लुक्कड यांनी केले. उमिदची अनाथ कन्या चि.सौ. कां. सुवर्णा यांच्या विवाह सोहळा सोशल डिस्टनसिंग पाळून साध्या पध्दतीने झाला.या मुलीच्या विवाह सोहळ्यास उम्मीद व आदमिले परिवारांसह मान्यवरांनी उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशिर्वाद दिले .

या जोडप्यापासुन होणारे बालक हे निरोगी असणार आहे अशी माहिती डाॅ.ब्रम्हाकुमारी प्रमिलाबेन दिदी यांनी दिली.
 
Top