कुर्डुवाडी शहरात एचआयव्ही पाॅझिटिव्ह मुलांचे संगोपण उम्मीद ही संस्था


कुर्डुवाडी (राहुल धोका) - उम्मीदच्या माध्यमातून दोन एचआयव्ही बाधित व्यक्तींचा विवाह होतोय. कुर्डुवाडी शहरात एचआयव्ही पाॅझिटिव्ह मुलांचे संगोपण उम्मीद ही संस्था करत आहे. डाॅ अशोक वागळे, डाँ.ब्रम्हाकुमारी प्रमिलाबेन (दिदी) आदिनी या आजाराने पिडीत मुलांचे संगोपण २००९ मध्ये सुरु केले होते. या भागातील नागरीकांनीहि त्यांना भरभरुन मदत केली आहे.  


        या संस्थेतील सुवर्णा व पंढरपूर येथील गणेश या दोन एचआयव्ही पिडीतांचा विवाह दि २८ रोजी पंढरपूर येथे होत असुन त्यामुळे उम्मीद परिवारात आनंदाचे वातावरण आहे. सुवर्ण व गणेश यांची मेडीकल चेकिंगमध्ये तब्येत सशक्त असल्याचे आढळले आहे ,त्यामुळे सदर शुभ मंगल निश्चित झाले आहे. 

  या जोडप्यापासुन होणारी संतती हि एचआयव्ही बाधित असणार नाही. अशा रोगावरही एक नवी उम्मीद जागवत हा क्षण शहरवासी व उम्मीद परिवारासाठी अत्यंत आनंदाचा ठरला आहे. 

 उम्मीद हि संस्था सध्या कोरोनामुळे आर्थिक संकटात आहे.या जोडप्यास वस्तु ,वस्त्र, आर्थिक स्वरुपात मदत करण्याचे आवाहन उम्मीदचे अधिक्षक अष्टविनायक संबळे-स्वामी यांनी केले आहे.
 
Top