मराठा आरक्षणासाठी र
स्ता रोको आंदोलन 

पंढरपूर - मराठा आरक्षणाला जी स्थगिती मिळाली आहे , त्याचा विरोधात व मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ सोलापूर जिल्हा,पंढरपूर शहर व तालुका यांच्यावतीने शुक्रवार दि १८/९/२०२० रोजी सकाळी १० वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले .

यावेळी पंढरपूर विभागाचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांना निवेदन देेेण्यात आले.यावेळी मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, सचिन गंगथडे, गुरूदास गुटाळ, संतोष जाधव, अमोल पवार, काका यादव,नागेश गायकवाड, प्रणव गायकवाड, सोमा झेंड,दिनकर चव्हाण, अमोल चव्हाण,पांडुरंग शिंदे,दिलीप मलपे,सचिन रोंगे,सुहास निंबाळकर, घाडगे सर,अमर सुरवसे, महेश बोडके,यशवंत बागल,महेश बिस्किटे,विवेक चव्हाण,जीवन गायकवाड,महेश उंबरकर,विनायक बोराटे,प्रदीप बोराटे,विनायक पडवळे,सचिन थिटे, संग्राम आसबे,ऋषीकेश मोरे,हर्षद मोरे,प्रमोद परदेशी, नागेश कोरके,नितीन मुळे,विनायक वडने, किशोर घाडगे,आण्णा भोसले,शैलेश घोगरदरे, दिगंबर जाधव,गणेश जाधव यांच्यासह मराठा महासंघाचे, तसेच मराठा समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर उपस्थित होते.
 
Top