कुर्डुवाडी,(राहुल‌‌ धोका) ,दि २१/०९/२०२०-
कुर्डुवाडी शहरात मराठा आरक्षणासाठी कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे .


कापड,सराफ,किराणा तसेच लहान व्यापारी स्वयंस्फुर्तीने यात सहभागी झाले होते.त्यामुळे बाजारपेठेसह शहरात सर्वत्र शुकशुकाट होता.

  परंडा चौक येथे दोन तास रस्ता रोको अंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक रविंद्र डोंगरे यांना मराठा समाजातील लहान मुलाच्या हस्ते निवेदन दिले गेले.


   यावेळी जोरदार घोषणा देण्यात येत होत्या.त्या माध्यमातून मोठा रोष दिसुन येत होता.आरक्षण आमच्या हक्काच, नाही कोणाच्या बापाचं अशा सारख्या घोषणा देण्यात येत होत्या.


   याप्रसंगी मराठा मोर्चाचे समन्वयक प्रवक्ते हर्षल बागल यांनी संबोधन केले. मराठा समाजाचे आरक्षण आल्याशिवाय नोकर भरती केली जावु नये आरक्षणाचा तिढा सुटल्यावरच पोलिस भरती करावी अशी मागणी त्यानी केली.

यावेळी सुरेश बागल,आप्पासाहेब उबाळे ,संदिप भराटे,लक्ष्मण बागल,वैभव बागल,संजय बागल, बप्पा बागल,गोविंद गोरे,शाम बोराटे,चंदु गवळी, सुहास टोणपे,मछिद्र कदम,गोरख उबाळे,दत्ता भराटे,रविराज बागल , सौरभ भोसले, नवनाथ कडबाने, बप्पा बागल, अनिल जगताप, अमित टोणपे, उदय शेळके, बाळासाहेब दास, गणेश शिंदे, ज्ञनेश्वर गरड, शंकर उबाळे , नंदु गवळी, शिवाजी बागल, रणजित राऊत, खंडु लोकरे आदि उपस्थित होते.

म्हैसगाव,अकुलगाव,चिंचगाव,तडवळे,लव्हे,लऊळ सापटणे, वडाचीवाडी, कुर्डु या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .आंदोलनामुळे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.पोलीस निरीक्षक रविंद्र डोंगरे यांंच्या मार्गदर्शनाखाली  त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.  
 
Top