कुर्डुवाडी
,(राहुल धोका),दि २२/९/२०२०- आज माढा तालुक्यात ५६ कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण सापडले तर ५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


माढा तालुक्यात आज कोरोना पाॅझिटिव्ह आढळलेली गाव -कुर्डुवाडी ७,माढा २,उंदरगाव ‌२ रिधोरे १०, शिंगेवाडी १, वेताळवाडी २,म्हैसगाव ५, रोपळे क ६ , कव्हे १ ,उपळाई बु‌ ६, भोसरे २ , वरवडे १, मोडनिंब १, टेंभुर्णी ९ व्यक्ति कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्या आहेत .

      समाधानाची बाब म्हणजे ५३ रुग्णांना आज डिस्चार्ज दिला असून आज कोणाचाहि मुत्यु तालुक्यात झालेला नाही अशी माहिती तालुका विस्तार अधिकारी डाॅ संतोष पोतदार यांनी‌ दिली आहे.

कुर्डुवाडी पंचायत समिती येथील विठ्ठलराव शिंदे सभागृहात नगरपरिषद व ग्रामीण रुग्णालय यांच्या कडून तपासणी शिबीर चालू असून‌ ८९ जणांचे रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आल्या त्यात २३ जण पाॅझिटिव्ह आढळले पैकी‌ ६ व्यक्ति कुर्डुवाडी तर १७ व्यक्ति ग्रामीण भागातील असल्याची माहिती नगरपालिका स्वच्छता निरीक्षक तुकाराम पायगण यांनी दिली‌ आहे.
 
Top