माढा तालुका - ३४ कोरोना पाॅझिटीव्ह तर ४ मयत

कुर्डुवाडी,(राहुल‌ धोका),दि २१/९/२०२० - माढा तालक्यात ३४ व्यक्ति पाॅझिटिव्ह आढळल्या असून ४ व्यक्ति मयत झाल्या आहेत .

   माढा तालुका क्षेत्रात आज चार जणांचा मुत्यु झाला असून सामान्यपणे तालुक्यातील मुत्युचे प्रमाण हे अधिक असल्याचे आढळत आहे . कुर्डुवाडी येथे आज तीन जणांचा तर माढयात एक जणाचा मुत्यु झाला आहे.

आज ३४ व्यक्ति पाॅझिटिव्ह सापडल्या असून कुर्डुवाडी ९ ,माढा १,उपळाई बु ५,पडसाळी१, मोडनिंब १ ,परिते १ ,टेंभुर्णी ५, कन्हेरगाव १,रांझणी २, लहु १, भोसरे १, रिधोरे ४, भुताष्टे १, पिंपळनेर १ अशा व्यक्ति पाॅझिटिव्ह आढळून आल्या आहेत .

५२ रुग्णाना आज डिश्चार्ज दिला आहे. कुर्डुवाडी पंचायत समिती येथे आज ७४ व्यक्तिची रॅपिड अँटीजन तपासणी करण्यात आली असून १६ व्यक्ति पाॅझिटिव्ह आढळल्या आहेत. यात कुर्डुवाडी ९ तर ग्रामीणमध्ये ७ जणांचा समावेश आहे अशी माहिती स्वच्छता निरिक्षक तुकाराम पायगण यांनी दिली आहे.
 
Top