आज ४३ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज 

कुर्डुवाडी,(राहुल धोका),दि२०/०९/२०२०- माढा तालुक्यात आज ११ कोरोना पाॅझिटिव्ह आणि ४ मयत तर ४३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

माढा तालुक्यात आज ११ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळल्या आहेत आणि ४ जणांचा मुत्यु झाला असुन तालुक्यातील मृत्युचे प्रमाण अधिक असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे.

कुर्डुवाडी ४ , कुर्डु २,भुताष्टे २,उपळाई बु ३ व्यक्ति कोरोना पाॅझिटिव्ह सापडल्या असून समाधानाची बाब म्हणजे ४३ जणांन रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याची माहिती तालुका आरोग्य विस्तार अधिकारी डाॅ संतोष पोतदार यांनी दिली आहे.

पंचायत समिती कुर्डुवाडी येथे नगर परिषद व ग्रामिण रुग्णालयाच्या माध्यमातून ६८ व्यक्तिंची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली त्यात शहरा तील ५ व ग्रामीण भागातील ३ व्यक्ति पाॅझिटिव्ह आल्याची माहिती नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक तुकाराम पायगण यांनी दिली आहे.
 
Top