रुग्णांकडून योगा करुन घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये वेगाने सुधारणा
पतंजली योगा शिबिरे व पुस्तके वाचून आपण योग शिक्षण घेतल्याचे त्यानी सांगितले. कोविड सेंटर येथे जावून योगा शिकवण्यास धोका असल्याने योग शिक्षणासाठी कोणीही पुढे येत नव्हते अखेर घुगे यानी पुढाकार घेतला .
सुक्षम व्यायाम,कपाल भाती, बह्य प्राणायम, आग्नीसार, अनुलोम विलोम, भ्रमरी, भस्त्रिका व आसने ते कोरोना रुग्णांकडून करुन घेत आहेत .
कोविडसेंटरमधील रुग्णांकडून योगा करुन घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये वेगाने सुधारणा होत आहे, भुक न लागणे,थकवा येणे यासारख्या समस्या कमी होत आहेत अशी माहिती सेंटरचे वैद्यकिय अधिकारी डाॅ शुभम खाडे यांनी दिली आहे.
कुर्डुवाडी शहरात नगरपरिषद कार्यालय व अंतभारती प्रशाला येथेहि नागरिकांना रवींद्र भांबुरे व लक्ष्मण भोंग हे पतंजलिच्या माध्यमातून योग प्रशिक्षण देत आहेत.
कोरोना हा फुफ्फुसाचा आजार असून यासाठी प्रत्येक नागरिकांने अनुलोम विलोम,भस्त्रिका, कपाल भाती करावी या मुळे रोग प्रतिकारक शक्ति वाढुन रोगा पसुन बचाव होईल असे योग शिक्षक लक्ष्मण भोंग यानी सांगितले.