उपसभापती आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले पोलिसांचे अभिनंदन

मुंबई - अंबरनाथ येथे दि १५ सप्टेंबर २०२० रोजी सर्कस मैदान येथून एका चिमुकल्याचे अपहरण झाले होते या प्रकरणात भां.द.वी. कलम ३६३ गुन्हा नोंद करण्यात आला होता व सदर गुन्ह्यात पोलिसांनी तत्परता दाखवीत अपहरणकर्त्यांना पकडण्यात यश मिळविल्याबद्दल अंबरनाथ पोलिसांचे महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अभिनंदन केले आहे .

मात्र दिवसाढवळ्या अपहरणाचे होणारे प्रकार थांबविणे अत्यंत आवश्यक

    मात्र दिवसाढवळ्या अपहरणाचे होणारे प्रकार थांबविणे अत्यंत आवश्यक असून यामध्ये बालकांचे अपहरण करणारी आंतरराष्ट्रीय कुठली टोळी आहे का याबाबतीत तपास व्हावा, त्यासाठी आपल्या स्तरावरून आपल्या हद्दीतील सर्व पोलीस स्टेशनला सतर्कता बाळगण्याचे आदेश व्हावेत व अंबरनाथ पोलिसांनी केलेल्या कारवाई प्रकरणात गुन्हेगारांवर अत्यंत कठोर कारवाई कशा पद्धतीने करता येईल जेणेकरून त्याचा वचक इतर अपहरणकर्त्यांवर बसेल त्यादृष्टीने योग्य तो तपास कसा करता येईल याबाबत आपल्या स्तरावर मार्गदर्शन करावे असे पत्र पोलीस आयुक्त विवेक फंसाळकर,ठाणे शहर जि.ठाणे यांना महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले आहे.
 
Top