१५७ सहभागी ग्रामस्थापैकी १० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

खर्डी,(अमोल कुलकर्णी)- पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील सिताराम महाराजांच्या मठामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र खर्डी मार्फत कोरोना तपासणी करण्यात आली.यामध्ये १५७ सहभागी ग्रामस्थापैकी १० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकारी विलास जाधव यांनी दिली.वैद्यकीय तपासणी वेळी तंत्रज्ञ डॉ प्रसाद कुलकर्णी,शिवाजी कांबळे,संजय मोरे,महेश जेठे,मोहन यादव,पिंटू क्षीरसागर, लक्ष्मण साबळे,अजित अभंगराव, सुनीता शिंदे ,समाधान लोहार, अण्णा पवार यांच्या सह आशा स्वयंसेविका उपस्थित होते.
         
          दोन रुग्णांची फेरतपासणी 

रॅपिड तपासणीत खर्डी येथील चार रुग्ण तर तपकिरी शेटफळ येथील सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. बोहाळीसह उंबरगाव ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला. गावातून ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला दोन रुग्णांची फेरतपासणी करण्यात आली. दहा रुग्णांना वाखरी येथील कोविड सेंटर मध्ये हलवण्यात आले आहे. यापूर्वी गावांमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील स्थानिक व्यापारी, किराणा दुकानदार, तसेच हॉटेल चालकांची तपासणी करण्यात आली.खर्डीचे सरपंच रमेश हाके ,ग्रामपंचायत सदस्य सिताराम रोंगे,संभाजी चव्हाण,अनिल कांबळे,बंडू रणदिवे , बालाजी रोंगे यांचे सहकार्य लाभले.
 
Top