मुंबईला पाकव्याप्त काश्मीर आणि मुंबई पोलिसांबद्दल चुकीचे विधान करणारी कंगणा राणावत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- अजित संचेती,जनसंपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य,भारतीय राष्ट्रवादी पार्टी
पिंपरी चिंचवड - मुंबईला पाकव्याप्त काश्मीर आणि मुंबई पोलिसांबद्दल चुकीचे विधान करणारी कंगणा राणावत विरोधात भारतीय राष्ट्रवादी पार्टी आक्रमक झाली आहे .पिंपरी चिंचवड शहरतर्फे भारतीय राष्ट्रवादी पार्टीच्यावतीने कंगणाचा धिक्कर करत पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.

अनेक अभिनेते झिरोचे हिरो झाले, परंतु

निवेदनामध्ये मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी,देश व महाराष्ट्राची शान असून संपूर्ण जगात मुंबईचे एक वेगळे महत्त्व आहे.चित्रपट सृष्टीचा गड असलेल्या मुंबईने महाराष्ट्रला अनेक कलावंत दिले,अनेक अभिनेते झिरोचे हिरो झाले, परंतु आज ज्या पद्धतीने कंगणा राणावत नावाच्या एका अभिनेत्रीने मुंबई व महराष्ट्राला उद्देशुन वादग्रस्त टीका करत राजकारण सुरू केले आहे तसे कधीच घडले नव्हते,लाखो कोट्यवधींचे पोट भरणाऱ्या मुंबई व महाराष्ट्रवर कोणी टीका केली नसेल अशी टीका या कंगणा राणावत नावाच्या बाईने केली आहे.

मुंबई ही पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या काश्मीर सारखी वाटू लागली आहे,असे वक्तव्य करून मुंबई ला पाकिस्तानचा दर्जा देऊन देशद्रोहाचे कार्य केले आहे.ज्या मुंबई आणि महाराष्ट्रने कंगणाला मोठे केलं ज्या मुंबईत राहिली, मोठी झाली तिला आता मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटू लागले,हे निंदनीय आहे,तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तिला मुंबई आणि महाराष्ट्रात येण्यास बंदी घालावी असे निवेदन पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त कडे देण्यात आले.

निवेदन देताना भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे जन संपर्क प्रमुख महा,राज्य अजित संचेती, महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष संदीप गायकवाड,चित्रपट सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील,पिंपरी चिंचवड युवा शहराध्यक्ष अक्षय घोडके,युवा उपाध्यक्ष गिरीश पाटील, राहुल उन्माळे उपस्थित होते.
 
Top