विभागतील सर्व पोस्ट कार्यालयात बँकिंग सुविधा उपलब्ध

     पंढरपूर , दि.२५/०९/२०२० - इंडीया पोस्ट पेमेंट बँक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती आता थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. गावातील प्रत्येक पोस्ट कार्यालयात नागरिकांना बँकींग सेवा मिळणार असल्याची माहिती पंढरपूर डाक विभागाचे अधिक्षक एन. रमेश यांनी दिली आहे .

  राज्य सरकारकडून मागासवर्गीय,अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती मिळते. यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे गरजेचे आहे. इंडीया पोस्ट पेमेंट बँक ही राष्ट्रीयकृत बँक असून, मोबाईलवर काही वेळातच विद्यार्थ्यांना इंडीया पोस्ट पेमेंट बँकेच्या ॲपव्दारे खाते उघडता येते. पंढरपूर डाक विभागातील सुमारे ७५० विद्यार्थ्यांनी आपले खाते उघडले असून, सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर,करमाळा,माळशिरस,माढा तालुक्यातील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी खाते उघडवावे असे आवाहन अधिक्षक एन.रमेश यांनी केले आहे.

   पंढरपूर डाक विभागातील प्रत्येक गावामधील पोस्ट कार्यालयात इंडीया पोस्ट पेमेंट बँक सेवा देणार आहे. विद्यार्थ्यांना,नागरिकांना, व्यावसयिक यांना गावातच राष्ट्रीयकृत बँकेची सेवा मिळणार आहे. या बँकिंग सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा. बँक खाते उघडण्यासाठी आधारकार्ड व मोबाईल नंबर आवश्यक असून आपल्या जवळच्या पोस्ट कार्यालयात बँक खाते उघडावे,असे आवाहन अधिक्षक एन.रमेश यांनी केले आहे.
 
Top