सामाजिक अंतर राखण्याचा नियमांचं पालन केलं जाईल याची शाश्वती नसल्याने मंदिर बंदच

मुंबई - Covid-19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रार्थनास्थळ न उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला असून या संदर्भात असोसिएशन ऑफ एडिट जस्टिस या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या व्यासपीठावर समोर सुनावणी झाली.

यावेळी निर्बंधासह धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय घेतला तर जनतेकडून सामाजिक अंतर राखण्याचा नियमांचं पालन केलं जाईल याची शाश्वती नसल्याचे राज्य सरकारने न्यायालयात सांगितलं.शहरी तसेच ग्रामीण भागातही कोरोना ग्रस्तांच्या संख्येत दररोज झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात घेता न्यायालयाने राज्य सरकारच्या या निर्णयात हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेऊन संबंधित याचिका फेटाळून लावली आहे.
 
Top