पाव्हन जरा खाजवा की आपलं टकुर...........

गहू पिकवतो कोण ?
शिरा खातो कोण ?
शेण काढतो कोण ?
तूप लोणी खातो कोण ?
कापूस पिकवतो कोण ?
वस्त्र नेसतो कोण ?
घाम गाळतो कोण ?
गाड्या उडवतो कोण ?
महालात राहतात कोण ?
रक्त शोषण करतो कोण ?
सत्तेत येतो कोण ?
संविधान मतिमोल करतो कोण ?.
सत्याचा पंचनामा करतो कोण ?
महात्म्यान्चा पराभव करतात कोण ?

: गोफणगुंडा :


सत्तेच्या राजकारणाला
पक्षांतराचा वात झोम्बतो आहे 
जो तो सावलीच्या मागे धावतो आहे 
माणसाला आपल्या एवढी देखील 
अक्कल नाही हे पाहून  
गाढवं सुदीक हसते आहे"

आनंद कोठडीया,जेऊर
९४०४६९२२००


 
Top