: जाईल तिथे ......

जाईल तिथे भ्रष्टाचारांचे भूत आहे
प्रत्येक पायरीवर त्यांचे सूत आहे!

कार्यालयात संविधानाचा प्रकाश आहे
टेबलावर फाईल तर खाली अंधार आहे !

यंत्रणेत त्यांचाच प्रभावी वाण आहे
चारित्र्य त्यांच विकृतिची खाण आहे !

कोठेही जा संधीसाधू दलालांचाच प्रभाव आहे
सत्याचा संविधान अन महात्म्यांचा पंचनामा आहे !!

सत्याग्रही आपल्या शक्तीनुसार लढतो आहे
देश मात्र समुद्र सारेच पोटात घालतो आहे !!टोलनाका:

आज राजकारणात सर्व चालू आहेत
साधल्याचे सोबती आहेत
घावल तसं लाटत आहेत
स्वार्थासाठी एकमेकाना डोक्यावर घेत आहेत
सारेच संधीसाधू आहेत
विश्वासास कोण पात्र आहेत?
सारेच एकाच वाणाचे आहेत !!

आनंद कोठडीया,जेऊर ९४०४६९२२००
 
Top