खासदार राजकुमार धूत यांनी ५० लाख रुपये निधी दिला नगरपरिषदेसपंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने खासदार राजकुमार धूत यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सुमारे ५० लाख खर्च करून गॅसदाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले होते यासाठी आमदार प्रशांत परिचारक व शिवसेनेचे नेते जिल्हा परिषद सदस्य संभाजीराजे शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून खासदार राजकुमार धूत यांच्याकडे गॅसदाहिनी च्या कामासाठी खासदार निधी मिळण्याबाबत मागणी केली होती त्यानुसार खासदार राजकुमार धूत यांनी ५० लाख रुपये निधी नगरपरिषदेस दिला होता .त्यामध्ये नगरपरिषदेने स्वनिधी घालून ही गॅसदाहिनी बांधली आहे.


त्यानुसार आज पंढरपूर शहरातील व तालुक्या तील मयत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ही गॅस दाहिनी(gas cremation in pandharpur) कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष सौ साधनाताई नागेश भोसले यांनी दिली.आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर या गॅस दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष नागेश भोसले , मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पक्ष नेते गुरुदास अभ्यंकर उपमुख्य अधिकारी सुनील वाळुजकर ,आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे व सफाई कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र डांगे हे उपस्थित होते. 
Top