पंढरपूर,१६/०९/२०२० - श्नी विठ्ठल,चंद्रभागा, सिताराम कारखान्याने शेतकर्याची थकीत ऊस बील द्यावीत शेतकर्याची फसवणूक करणार्यां कारखानदारावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

पंढरपूर तालुक्यातील श्नी विठ्ठल, चंद्रभागा, व सिताराम महाराज कारखान्यांनी शेतकरर्याची थकीत बिले, कामगारांचा पगार,टँकर मालकांचे वाहतूक भाडे गेली अनेक दिवस झाले तरी दिले नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने दि. बुधवार २३/०९/२०२० रोजी तहसील कार्यालय पुढे बेमुदत आंदोलन करणार असल्याचे निवेदन आज नायब तहसीलदार श्री. पिरजादे यांना देण्यात आले.

खर्डी येथील सीताराम महाराज कारखान्याने २०१८-१९ मधील शेतकर्याचे थकीत ऊस बील अद्याप जमा केले नाही, त्याचबरोबर विठ्ठल सहकारी कारखान्याने एफआरपीचा हप्ता, कामगारांचा पगार,पीएफची रक्कम अद्याप दिला नाही,चंद्रभागा कारखान्यानेही शेतकर्याचे पैसे न दिल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

शुगर अँक्ट कायद्यानुसार शेतकर्याचा ऊस गेल्या नंतर १५ दिवसात एफआरपीचा हप्ता ऊस उत्पादक शेतकर्याच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक असते परंतु या कायद्याची अंमल बजावणी झाली नसल्यामुळे आर.आर.सी.च्या नियमानुसार त्वरित कार्यवाही करून कारखाना विक्री करून शेतकर्याना ऊस बिले द्यावीत आणि या कारखानदारांवर फसवणूकीचे गुन्हे दाखल करावेत असे या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्नीकांत नलवडे, उपाध्यक्ष, व्यंकटरमण देशमुख,जिल्हा युवक उपाध्यक्ष सुरेश नवले,जिल्हा संपर्क प्रमुख माऊली भोसले ,तालुकाध्यक्ष सचिन आटकळे, उपाध्यक्ष रमेश लंगोटे,आप्पा भोई,बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवार, जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष पंकज देवकते सचिन कारंडे आदी उपस्थित होते.
 
Top