नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान

    नातेपुते,(श्रीकांत बाविस्कर) २०/०९/२०२० - मळवली, ता. माळशिरस येथे काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील ओढ्याला मोठ्या प्रमाणावर पुर आल्यामुळे ओढ्यालगत राहणार्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सर्व संसार उपयोगी साहित्य तसेच मोठ्या प्रमाणावर घराची पडझड झाली ,पाळीव प्राणी वाहून गेले.


   त्याप्रसंगी त्या नागरिकांची मौजे मळवली येथे जाऊन राष्ट्रवादीचे नेते संकल्प हणमंत डोळस यांनी भेट घेतली.सर्व झालेल्या नुकसानीची पाहणी करताना  तातडीने पंचनामे करून झालेल्या नुकसानीची शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले.

   तसेच पुरामध्ये ज्या नागरिकांच्या घराची पडझड झाली त्या नागरिकांना अन्नधान्य,जीवनावश्यक किट उपलब्ध करून दिले. त्यावेळी त्यांचा समवेत राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष प्रभाकर इंगळे देशमुख राेहित (दादा) पवार विचार मंचचे प्रदेश सचिव मच्छिंद्र ठवरे, तालुका माजी युवकाध्यक्ष वैभव जाधव, विनायक भगत यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top