सौ.जयमालाताई गायकवाड यांनी घटनास्थळी धाव
 

   पंढरपूर ,(प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी सततच्या पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे.पंढरपूर तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद गटातील गार्डी येथील झालेल्या अतिवृष्टी मुळे व सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे संपूर्ण गावातील लोकांचे संसार उध्दवस्त झाले आहेत . संपूर्ण गावाला पाण्याने वेढा घातला आहे.जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला मात्र प्रशासनाकडून फक्त पंचनामे करण्यात आले आहेत. अजून कोणत्याही प्रकारची मदतकार्य पोहचले नाही मात्र सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष सौ.जयमालाताई गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित विभागाला सुचना देत सर्वसामान्य लोकांना रात्रीच्या जेवण उपलब्ध करून दिले .

पूर परिस्थितीमध्ये गार्डी गावातील अनेकांचे संसार उध्वस्त झाले ,अनेकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य व्यवसायाकांची दुकाने ,शेतकऱ्यांचे पशूधन यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. या पुरग्रस्तांना मदत देण्यासाठी सौ.जयमालाताई गायकवाड गार्डी ग्रामस्थांच्या मदतीला धावून आल्याने पुरग्रस्त लोकांच्या चेहऱ्यावर आनंद झाला होता.

    पुराचे पाणी गावातील शेतात घुसल्यामुळे डाळिंबाच्या बागा,ऊस,शेतातील उभी पिके, कोंबड्या,शेळ्या मेंढ्या अक्षरशः वाहून गेली तर राहती घरेही जमीनदोस्त झाली आहेत.निसर्गाच्या अवकृपेमुळे येथील शेतकऱ्यांवर फार मोठे संकट ओढवले आहे अशा संकटात त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी सर्वप्रथम राष्ट्रवादीच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष सौ.जयमालाताई गायकवाड या पुढे सरसावले आणि त्यांनी प्रत्यक्ष थेट घटनास्थळी जाऊन झालेल्या या नुकसानाची पाहणी केली. अचानक आलेल्या या संकटातून सावरण्यासाठी प्रशासनाने अजिबात दिरंगाई न करता आपत्कालीन परिस्थितीचे गांभीर्य ओळखून येथील शेतकऱ्यांचे व सामान्य नागरिकांचे झालेले नुकसान पाहता, अशा नुकसानग्रस्त नागरिकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत मिळवून द्यावी अशी आग्रही मागणी मा.जि.प.अध्यक्षा सौ.गायकवाड यांनी केली आहे,
 
Top