फिट इंडिया चळवळीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त फिट इंडिया संवादाचे आयोजन

   नवी दिल्ली,२२ सप्‍टेंबर २०२० -पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ सप्टेंबर २०२० रोजी फिट इंडिया चळवळीचा पहिला वर्धापन दिन साजरा करताना अनोख्या उपक्रमाअंतर्गत आयोजित देशव्यापी ऑनलाईन फिट इंडिया संवादादरम्यान तंदुरुस्ती बाबत उत्साही लोकांशी,नागरिकांशी संवाद साधतील.

ऑनलाईन संवादामध्ये सहभागी झालेले स्वत:च्या तंदुरुस्तीबाबतचे किस्से आणि सूचना सामायिक करतील आणि पंतप्रधानांकडून तंदुरुस्ती आणि उत्तम आरोग्याबद्दल मार्गदर्शन घेतील. यामध्ये विराट कोहली, मिलिंद सोमण तसेच रुजुता दिवेकरसारखे फिटनेस तज्ञ भाग घेणार आहेत.

कोविड -19च्या काळात तंदुरुस्ती हा जीवनाचा सर्वात महत्त्वाचा घटक बनला आहे.या संवादामध्ये पोषण, निरोगीपणा आणि तंदुरुस्तीबाबत इतर पैलूंवर योग्य वेळी आणि फलदायी चर्चा दिसून येईल.

पंतप्रधानांनी लोकचळवळ म्हणून मांडलेल्या संकल्पनेतून फिट इंडिया संवाद हा देशातील नागरिकांना सहभागी करून घेऊन भारताला तंदुरुस्त राष्ट्र बनवण्याच्या योजनेसाठी आणखी एक प्रयत्न आहे. फिट इंडिया चळवळीची ज्या मूलभूत तत्त्वावर कल्पना केली गेली होती, त्या नुसार नागरिकांना तंदुरुस्त राहण्यासाठी मजेदार, सोप्या आणि विनाखर्चिक मार्गांचा अवलंब करणे आणि वर्तनात बदल घडवून आणणे ज्या योगे तंदुरुस्ती प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा अनिवार्य भाग बनवण्याच्या प्रयत्नाना या संवादाद्वारे बळ मिळेल.

गेल्या एका वर्षात,फिट इंडिया चळवळीच्या अंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये देशातील सर्व स्तरातील लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला. फिट इंडिया फ्रीडम रन,प्लॉग रन, साइक्लोथॉन,फिट इंडिया वीक, फिट इंडिया स्कूल सर्टिफिकेट आणि इतर विविध कार्यक्रमांमध्ये साडेतीन कोटींहून अधिक लोकांचा एकत्रित सहभाग दिसून आला ज्यामुळे ती खर्‍या अर्थाने लोकचळवळ बनली आहे.

फिट इंडिया डायलॉग, ज्यामध्ये देशभरातील तंदुरुस्तीबाबत उत्साही लोकांचा सहभाग पहायला मिळणार आहे, त्यातून देशभरातील चळवळीच्या यशाचे श्रेय नागरिकांना आहे, हा विश्वास आणखी दृढ होतो.

२४ सप्टेंबर रोजी दुपारी ११.३० पासून एनआयसी लिंकवर, https://pmindiawebcast.nic.in वर कोणीही फिट इंडिया संवादात सहभागी होऊ शकेल.
 
Top