पुण्यातील पत्रकारांबरोबर एक वेबिनार


डॉ.नीलम गोऱ्हे यांची उपसभापती विधान परिषद या पदावर पुनर्नियुक्ती झाल्याच्या अनुषंगाने व दिनांक १२ सप्टेंबर रोजीच्या त्यांच्या वाढदिवस अनुषंगाने पुण्यातील पत्रकारांबरोबर एक वेबिनार घेण्यात आला. 

त्या वेबिनारमध्ये बोलताना त्यांनी उपसभापतीपद हे बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने मिळाले आहे. या पदाचा उपयोग सर्वसामान्यचे प्रश्न सोडविण्यासाठी नक्की करेन असे सर्वाना आश्वासित केले. 

महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाच्या अनुषंगाने राज्यामध्ये एक विशेष व्यासपीठ तयार करावे

  या वेबिनारमध्ये दै.लोकसत्ताचे पुणें निवासी संपादक मुकुंद संगोराम, दै.सकाळ,पुणेंचे संपादक सम्राट फडणीस,दै.महाराष्ट्र टाईम्सचे पुणें संपादक श्री.लोणी ,दै.केसरीचे स्वप्नील पोरे तसेच संभाजी पाटील,विठ्ठल जाधव व अनेक मान्यवर पत्रकार सहभागी झाले होते.  

    यावेळी अनेक विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाच्या अनुषंगाने राज्यामध्ये एक विशेष व्यासपीठ तयार करावे व नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून महिलांचे प्रश्‍न सोडवण्याच्या हेतूने प्रयत्न करावा, दीड लाखांच्या आतील बिल्सदेखील ही आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे विशेष पथका मार्फत तपासली जात नाहीत.यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची लूट होते अशा प्रकारची तक्रार झाल्या. 

   पश्चिम महाराष्ट्र आणि अन्य जवळच्या जिल्हया तील सारख्या स्वरुपातील प्रश्न सोडवण्याचे अनुषंगाने पुण्यामध्ये विधानभवनचे एक ऑफिस असावे. त्यामुळे भारतीय लोकशाहीचा अभ्यास करणारे विद्यार्थ्यांना विधानभवनाच्या कामकाज संदर्भात अभ्यास व कामांचा पाठपुरावा सोपा होईल अशी चर्चा झाली.  हक्कभंग या आयुधाचा वापर योग्य प्रकारे व प्रभावीपणे कसा करता येईल, लॉक डाउनच्या कालावधीमध्ये अनेकांचे रोजगार गेले व अनेकांना विज बिल मोठ्या प्रमाणात वाढून आलेले आहे, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्नपत्रिका(MCQ) देण्यात येणार असल्याबाबत बातम्या येत आहेत. मुलांची ह्या परिक्षेबाबत कोणतेच ज्ञान नाही अशा प्रकारच्या प्रश्नांवर नीलमताई गोर्हे यांनी लक्ष घालावे अशा अपेक्षा पत्रकारांनी व्यक्त केल्या.

   या प्रश्नांवर उत्तर देत असताना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या प्रश्नासंदर्भात विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासित करण्यात आले व नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे सांगितले.
 
Top