सायबर गुन्ह्यात झाली मोठ्या प्रमाणात वाढ .

     मुंबई - दि.२६ सप्टेंबर,२०२०- नागपूर येथील अधिवेशनाच्या काळात प्रधान सचिव गृह विभाग, विशेष पोलीस महानिरीक्षक सायबर सेल व इतर अधिकाऱ्यांची दि१९डिसेंबर २०१९ रोजी बैठक घेऊन ऑनलाईन ट्रोलिंग,ऑनलाईन बलात्काराच्या धमक्या देणे अशा महिलांच्या तक्रारींबाबत सूचना दिल्या होत्या. तसेच महिलांनी अशा तक्रारी ऑनलाइन पोलीस महासंचालकांच्या ट्विटर हँडलला कराव्यात व त्याचा संबंधित कार्यक्षेत्राच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सायबर सेलमार्फत तपास करून कार्यवाही करण्याबाबत सुचित केले होते. राज्यातील सायबर पोलीस स्टेशनची संख्या व कर्मचारी वर्ग वाढवून धमकी देणाऱ्याचे सोशल मीडियावरील खाते बनावट आढळल्यास त्याचा आयपी अँड्रेस शोधून त्यांचेवर कारवाई करण्याचे सूचित केले होते.

     पोलीसांकडून केली जाणारी कायदेशीर व प्रतिबंधक कारवाईत सुधारणांचा आढावा

याबाबतीत असे निदर्शनास आले आहे की,सायबर गुन्ह्यात ५००% वाढ झाली आहे.आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. फेसबूक व अन्य सामाजिक माध्यमांवर कपल चॅलेंज व तत्सम ट्रेंड चालवून मोठ्या प्रमाणावर खाजगी छायाचित्रे अपलोड करण्यास सर्वसामान्यांना प्रवृत्त करण्यात येत आहे. या छायाचित्रांचा विशेषतः महिलांच्या छायाचित्राचा गैरवापर होण्याची मोठी शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे.

   याबाबतीत सायबर लॉ नुसार तसेच घटनादत्त प्रायव्हसी लॉ नुसार कार्यवाही होणे अपेक्षित आहे. सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करणे आवश्यक आहे.याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेण्याचे नियोजन आहे. सदर बैठकीला आपणही उपस्थित रहावे ही विनंती. तसेच उपरोक्त बाबतीत संबंधिताना उचित आदेश व्हावेत अशी विनंती व शिफारस गृहमंत्री अनिल देशमुख,महाराष्ट्र शासन यांना विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्यावतीने करण्यात आली आहे .
 
Top