वैद्यक संशोधनाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी एव्हीआरए लॅबोरेटरीजची सीएसआयआर मध्ये तीन संशोधन अध्यासन स्थापन करण्याची घोषणा

नवी दिल्ली, PIB Mumbai,२६/०९/२०२०-सीएसआयआर - इंडियन इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ.एस. चंद्रशेखर आणि सीएसआयआर- नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे वरिष्ठ प्रधान शास्त्रज्ञ डॉ. अमोल कुलकर्णी यांना २०२०-२०२३ या कालावधीसाठी फेलोशिप जाहीर करण्यात आली आहे.

कोविड चाचणी केंद्र उभारण्यासाठी अर्थ साहाय्याचे पाठबळ देणार

सीएसआयआरच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने एव्हीआरए या पद्मभूषण डॉ. ए. व्ही रामा राव यांनी स्थापन केलेल्या देशातील अग्रगण्य औषधनिर्मिती कंपनीने आज वैद्यकक्षेत्राशी संबंधित संशोधनासाठी सीएसआयआरमध्ये तीन संशोधन अध्यासन स्थापन करण्याची घोषणा केली. या अध्यासनाअंतर्गत निवड झालेल्या शास्त्रज्ञांना त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी तीन वर्षांची फेलोशिप दिली जाणार आहे.

कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व( सीएसआर) कार्यक्रमाचा एक भाग म्हणून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने(एचएएल) हिमाचल प्रदेशात एक तात्पुरते रुग्णालय उभारण्यासाठी आणि लडाखमध्ये कोविड चाचणी केंद्र सुरू करण्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी देण्याची तयारी दर्शवली आहे.

         पुण्याच्या टाटा केमिकल्स लिमिटेडला फ्रक्टो ऑलिगोसकाराईड्स( एफओएस) किंवा फोसेन्स म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या उत्पादनाच्या तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीबद्दल प्रतिष्ठेचा सीएसआयआर हिरक महोत्सवी तंत्रज्ञान पुरस्कार २०१९ प्रदान करण्यात आला.पूर्णपणे विरघळणारा हा तंतुमय पदार्थ असून आरोग्य आणि जीवनशैलीबाबत जागरुक असणाऱ्या ग्राहकांसाठी तो उपयुक्त आहे.

सीएसआयआरने आज आपला ७९ वा वर्धापन दिन आपल्या संकुलात साजरा केला. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान, आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री आणि सीएसआयआरचे उपाध्यक्ष डॉ. हर्षवर्धन यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. यावेळी सीएसआयआरचे महासंचालक आणि शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन विभागाचे सचिव डॉ. शेखर मांडे, एचआरडीजीचे आणि सीएसआयआरच्या सर्व प्रयोगशाळांचे प्रमुख ए. चक्रवर्ती आणि इतर विविध समाज माध्यम मंचांच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते
 
Top