शासकिय कोविड सुरु होत नसल्याने प्रचंड गैरसोय

कुर्डुवाडी,(राहुल धोका) - कुर्डुवाडी शहरात शासकिय कोविड सेंटर नगरपालिका शाळेत उभा आहे ते त्वरीत सुरु होणे आवश्यक आहे.कुर्डुवाडी परिसर व माढा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमण वाढत आहे. यामध्ये गरीब व अल्प उत्पन्न असलेल्या जनतेची शहरात मंजुर असूनही शासकिय कोविड सुरु होत नसल्याने प्रचंड गैरसोय होत आहे. माढा तालुक्यात दोन खाजगी कोविड सेंटर कुर्डुवाडी येथे आहेत त्यांची मर्यादाहि केवळ साठ बेडचीच आहे  

आर्थिक कुवत नसलेले व गरीब जनतेचा कोणीच वाली राहिला नाही. कोरोना संक्रमण वाढत आहे अशा परिस्थितिमध्ये निष्क्रिय प्रशासन तसेच सेंटर उभा करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती नसलेले नेते यामुळे कुर्डुवाडी शहरात मंजूर असूनही कोविड सेंटर उभा राहू शकले नाही. 
सर्व राजकिय गट तट विसरुन तालुक्यातील नेत्यांनी शासकिय अद्यावत कोविड सेंटर सुरु करावीत. सध्याची व्यवस्था पाहता भविष्यात रुग्ण रस्त्यावर दगावण्याची शक्यता आहे जर हे सेंटर सुरु झाले नाहीतर इतिहास कधीह माफ करणार नाही- 
डाॅ विलास मेहता 
   कुर्डुवाडी व जिल्हयातील येथील कोविड सेंटर साठी जिल्हा प्रशासनाकडे निधी उपलब्ध झाला परंतु त्याचा कुठे विनयोग झाला हा संशोधनाचा भाग आहे .कुर्डुवाडी शहर व परिसराची नेहमीच राजकिय दृष्टीने उपेक्षा झालेली आहे . तालुक्या तील आमदार, खासदार आतातरी आपणास न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत  आहे .परंतु राजकिय परिवर्तनानंतरही कुर्डुवाडी शहर व परिसराची उपेक्षाच होत आहे आशी तिव्र भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे आतातरी राजकिय नेत्यांनी सर्व मतभेद बाजुला ठेवून माढा - कुर्डुवाडी भागात शासकिय अद्यावत कोविड सेंटर उभा करावे. तालुक्यात चार साखर कारखाने आहेत शासन निर्णयानुसार प्रत्येक साखर कारखान्यात कोविड सेंटर उभा राहिले पाहिजे परंतु ऊस गळीत हंगाम सुरु होत असुन या बाबत कोणतीच हालचाल होताना दिसून येत नाही. 
 
Top