ग्रामीण भागात लोकांना या आजारावर प्राथमिक इलाज मिळत नाही 


सोलापूर, २७/०९/२०२०- देशामध्ये कोरोना महामारीचा उद्रेक आता सर्व ग्रामीण भागांमध्ये होत आहे . ग्रामीण भागातील लोकांना या आजारावर प्राथमिक इलाज मिळत नसल्याने घाबरून जिल्ह्यात येतात, पण आता भारतीय जैन संघटनेने तालुका पातळीवरील सर्व सामाजिक संस्थांनी पुढे येऊन "आपला समाज आपली जबाबदारी"ह्या अंतर्गत,आपल्या गावात कोविड केअर सेन्टर उभा केल्यास त्या त्या समाजातील लोक प्राथमिक उपचार तेथेच घेऊ शकतील व लवकर बरे होऊन घरी जाऊ शकतील. भारतीय जैन संघटना शासनाच्या नियमात राहून सुरू करण्यास सहकार्य व गाईड लाईन देण्यास तयार  आहे, असे भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष केतन भाई शहा यांनी आज हॉटेल ऐश्वर्या येथे भारतीय जैन संघटनेच्या सभेमध्ये सांगितले.


सभेच्या अध्यक्षस्थानी केतनभाई शहा तर विभागीय अध्यक्ष शाम पाटील राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष बंब, जिल्हाध्यक्ष अभिनंदन विभुते विभागीय महिला अध्यक्ष सुवर्णा कटारे, जिल्हा महिलाध्यक्ष मायाताई पाटील, महिला शहराध्यक्ष कामिनी गांधी , विभागीय सचिव वालचंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेची सुरुवात नमोकार महामंत्रने करण्यात आली.

       सर्वांच्या सहकार्याने हे सेंटर उभे केले जाईल

प्रास्ताविकात शाम पाटील यांनी लॉकडाउन झाल्यापासून केलेल्या कार्याचा आढावा घेतला व सोलापुरातील एनजीओच्या सहकार्याने कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. या सेंटरबद्दल अभिनंदन विभूते यांनी समाजातील व सर्व समाजातील लोकांना आमंत्रित करून जिल्हाधिकारी, आयुक्त,सी.ओ. यांच्या सोबत पुढच्या आठवड्यात चर्चेचे आयोजन करून सर्वांच्या सहकार्याने हे सेंटर उभे केले जाईल असे सांगितले.

यावेळी केतनभाई म्हणाले सांगलीच्या धर्तीवर सोलापूर शहरात आधी उभा करणार असून जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यात प्रमाण जास्त आहे तेथे कोविड केअर सेंटर उभे केले जाईल त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे .

यावेळी संजय भस्मे, गौरव आथनी, गौतम जैन, आनंद तलिकोटी,विजयकुमार छंचुरे,प्रशांत वर्धमाने,सोहम पाटील, अजिंक्य बाल स्वरूप, निशा शहा, प्रिया पाटील, वैभव पाटील, महेश आहेरकर , विक्रांत बशेट्टी ,नंदकुमार रणदिवे आदींची उपस्थिती होती .आभार कामिनी गांधी यांनी मानले.
 
Top