मुंबई - सामान्यांना दिलासा देण्यासाठी कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नव्या निर्णयानुसार राज्यात कोरोना चाचणी मागे ७०० रुपये कमी करण्‍यात आले आहेत. आता कोरोनाची चाचणी अवघ्या १२०० रुपयांमध्ये होणार आहे.

महिन्याभरापूर्वी चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात आली होती त्यानंतर यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार आता पुन्हा एकदा कमाल दर निश्चित करण्यात आले आहेत.

आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी १२००, १६०० आणि २००० रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोग शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मात्र या दराप्रमाणे चाचण्या न होता जादा दराने तपासण्या होत आहेत.रूग्ण आणि नातेवाईक आधिच घाबरलेले असतात. थोड्या पैशासाठी कोण कटकट करणार म्हणून सोडून देतात. त्यामुळे दरपत्रक दर्शनी भागात लावण्यात यावे आणि तक्रारीसाठी संपर्क नंबर द्यावा.
 
Top