कुर्डुवाडी,(राहुल धोका) १९/०९/२०२० - माढा तालुक्यात आज ७२ व्यक्ति कोरोना पाॅझिटिव्ह आल्या आहेत तर २ जणांचा मुत्यु झाला आहे.

माढा तालुक्यात आज ७२ व्यक्ती पाॅझिटिव्ह आल्या आहेत त्यात कुर्डुवाडी६,माढा ६ ,धानोरे ३, मानेगाव २,वडाचीवाडी तम १,मोडनिंब ७,लऊळ २,वरखेडे ६ ,परिते २, टेंभुर्णी ६, अलेगाव बु १ , म्हैसगाव ४, रिधोरे ४,भोगेवाडी २,तांदुळवाडी १८, कव्हे १, तडवळे १ ,रोपळे क १.

ग्रामीण रुग्णालय तथा नगरपरिषदकडून पंचायत समिती, कुर्डुवाडी येथे घेण्यात आलेल्या या शिबीरात ६३ जणाची रॅपिड अँटीजन टेस्ट ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक संतोष अडगळे यांनी केली. यात१३ व्यक्ति कोरोना पाॅझिटिव्ह आल्या आहेत.
 
Top