कुर्डुवाडीतील संख्या मात्र आटोक्यात

 कुर्डुवाडी (राहुल धोका)- माढा तालुक्यात आज ४१ व्यक्ति कोरोना पाॅझिटिव्ह आल्या तर दोन जणांचा मुत्यु झाला आहे.कुर्डुवाडीतील संख्या मात्र आटोक्यात आली आहे.

माढा तालुक्यात आज ४१ व्यक्ति पाॅझिटिव्ह आढळल्या आहेत त्यात - कुर्डुवाडी ५ ,माढा ७,वडशिंगे १ ,उपळाई खु १, मोडनिंब १,बैरागवाडी १, सापटणे २, तांबवे १,शिराळ टें २ ,उजनी टें १,
टेंभुर्णी ५ ,भोसरे ७ , रिधोरे १ ,मानेगाव १,अरण १,वरखडे १ , रोपळे क १,कव्हे २ अशी माहिती तालुका आरोग्य विस्तार अधिकारी संतोष पोतदार यानी दिली आहे.

   कुर्डुवाडी नगरपरिषद व ग्रामिण रुग्णालय यांच्या शिबिरात ४८ व्यक्तिंची तपासणी करण्यात आली यात शहरातील ५ व ग्रामीणचे ५ व्यक्ति कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्याची माहिती स्वच्छता निरिक्षक तुकाराम पायगण यांनी दिली आहे.

समाधानाची बाब म्हणजे ३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून कुर्डुवाडी शहरातील वाढती संख्या आटोक्यत आली आहे.
 
Top