कोरोना पॉझिटिव्ह नगरपरिषद कर्मचाऱ्यांना पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने उपचारासाठी एक लाख रुपये - नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले

पंढरपूर नगरपरिषदची स्थायी समितीची सभा संपन्न झाली या सभेमध्ये पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी सुनील वाळूजकर व सहकार्याध्यक्ष शरद वाघमारे यांनी नगरपरिषदेचे संवर्ग,आरोग्य कर्मचारी,नगरपरिषद रुग्णालयातील कर्मचारी,सर्व लिपिक शिपाई ,सर्व विभाग प्रमुख गेल्या पाच महिन्यापासून कोरोना विरुद्धची लढाई लढत आहेत. यामध्ये काम करत असताना चार कर्मचारी पॉझिटिव्ह झाले होते व भविष्यातसुद्धा कर्मचारी पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे .शासनाने नगरपरिषद कर्मचाऱ्यांना विमा देण्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.त्यामुळे नगरपरिषदने कर्मचाऱ्यांचा कोरोना कवच हा विमा उतरावा किंवा त्यांना उपचारासाठी एक लाख रुपये पर्यन्तचा खर्च देण्यात यावा अशी मागणी नगराध्यक्ष सौ साधनाताई नागेश भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, सर्व स्थायी समिती सदस्य यांना केली होती. 

उपचाराचा खर्चासाठी एक लाख रुपये देण्याचा निर्णय

     यास अनुसरून मुुख्याधिकारी यांनी हा प्रस्ताव स्थायी समितीच्यासमोर शिफारशीसह ठेवला.आज झालेल्या स्थायी समिती सभेमध्ये नगरपरिषद कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या उपचाराचा खर्चासाठी एक लाख रुपये देण्याचा निर्णय या सभेमध्ये घेण्यात आला.

    या सभेस नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले ,माजी नगराध्यक्ष व स्थायी समिती सदस्य दगडू धोत्रे ,वामनराव बंदपट्टे, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव ,पक्षनेते गुरुदास अभ्यंकर , आरोग्य समितीचे सभापती विवेक परदेशी, सौ रेहाना इब्राहीम बोहरी, सौ रेणुका धर्मराज घोडके यांनी या विषयाला एकमताने मंजुरी दिली. या निर्णयामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये संतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे . 

 नगरपालिकेने घेतलेला हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण आहे या घेतलेल्या निर्णयाबद्दल सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी समन्वय समिती व पंढरपूर नगर परिषद कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी सुनील वाळुजकर यांनी नगराध्यक्ष सौ साधनाताई भोसले सर्व स्थायी समिती सदस्य , सर्व नगरसेवक व विशेषतः मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांचे आभार व्यक्त केले
 
Top