कोरोना पेशंटसाठी Hetero हेटेरो कंपनीचे Remdesivir रेमडेसीव्हर नावाचे इंजेक्शन योग्य दरात मिळावे-शिवस्वराज्य युवा संघटना
 

 पंढरपूर,(प्रतिनिधी)-कोरोना पेशंटसाठी Hetero हेटेरो कंपनीचे Remdesivir रेमडेसीव्हर नावाचे इंजेक्शन दिले जाते.हे इंजेक्शन विषाणू प्रतिबंधक आहे,कोरोना पेशंटसाठी अत्यंत प्रभावशाली असल्याने कोरोना पेशंटसाठी जीवनावश्यक आहे. म्हणूनच या इंजेक्शनला सर्वच ठिकाणहून मोठी मागणी आहे.त्यामुळेच सदर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा सर्वत्र जाणवत आहे.आता तर सदर इंजेक्शन काळा बाजारात होत असल्याची चर्चा आहे.

  सदर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजीत पवार,आरोग्यमंत्री राजेश टोपे,सोलापूर जिल्ह्यातील पालकमंत्री दत्ता भरणे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी यांना निवेदन देण्यात आले असून आज प्रांत कार्यालयाचे नायब तहसिलदार श्री जमादार यांना निवेदन देण्यात आले व त्यांनी लक्ष घालून प्रशासनाकडे पाठपुरावा करून कोरोना पेशंटला कोरोना पेशंटला Remdesivir रेमडेसीव्हर इंजेक्शन योग्य दरात त्वरीत उपलब्ध करुन द्यावे अन्यथा शिवस्वराज्य युवा संघटना आंदोलन करेल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे . 

शिवस्वराज्य युवा संघटनेच्यावतीने निवेदन देताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे, पंढरपूर युवक तालुकाध्यक्ष रोहन विजय नरसाळे, शहराध्यक्ष किरण शिंदे, युवक शहराध्यक्ष अजय गुंड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top