कुर्डुवाडी
,(राहुल धोका),दि २३/९/२०२० -कुर्डुवाडी शहरात चार कोविड सेंटर आहेत मात्र ती अपुरी पडत आहेत.आता शासकिय सक्तीची गरज जाणवत आहेे.  


कुर्डुवाडी शहरात दोन शासकीय कोविड सेंटर आणि दोन खाजगी सेंटर सेवा देत आहेत परंतु आणखीनहि सेंटरची गरज भासत आहे.शहरात नुकतेच आधार हे खाजगी हाॅस्पीटल उभा राहिले असून डाॅ लकी दोशी,डाॅ अभिजीत नामदे या ठिकाणी उपचार देत आहेत.

रोहित क्लिनिक येथे हि खाजगी कोविड सेंटर मध्ये ३० बेडची सोय असून डाॅ रोहित बोबडे कोरोना रुग्णावरती उपचार करत आहेत.सदरच्या खाजगी सेंटरमुळे अनेक कोरोना रुग्णांचे प्राण वाचत आहेत. मात्र शहरात अजून व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे .शहरातील संकेत मंगल कार्यालय येथे शासकिय कोविड केअर असून आमदार बबनदादा शिंदे यांनी या ठिकाणी आँक्सीजन कंडेसर दिले आहे त्यामुळे अचानक आँक्सीजन कमी झाल्यास पेशंटची सोय होत आहे पीडब्ल्यूबीच्या माध्यमातुन सकाळचा नाष्टा , दोन वेळेस जेवण व हळदीचे दुध रोज रुग्णास निशुल्क दिले जात आहे. या ठिकाणी डाॅ शुभम खाडे हे रुग्णाना उपचार देत आहेत.येथे ८५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

श्रीराम मंगल कार्यालय येथील शासकिय कोविड मध्ये हि आमदार बबनदादा शिंदे यानी आँक्सीजन कंडेसर दिला आहे .भोजन व्यवस्था मोफत आहे. येथे ८५ बेडची सुविधा असून डाॅ सागर पाटील येथील व्यवस्था पाहत आहेत.पेशंटना अधिक लक्षणे असतील तर सिव्हील अथवा खाजगी सेंटर येथे शासकिय कोविडसेंटरमधून हलवावे लागत आहे.

खा.शरद पवार व साखर आयुक्त यांनी साखर कारखानदारांना कोविड सेंटर सुरु करण्यासाठी निर्देश दिले आहेत.आशा वर्कर यांना केवळ एक हजार मानधन मिळते. त्यांना कारखान्याच्या माध्यमातून जादा मानधन द्यावे तसेच माढा तालूक्यात दोन RH व १० PHC आहेत त्यात २५ डॉक्टर व ३०० पँरामेडीकल स्टाफ आहे यातील १०% स्टाफ कुर्डुवाडी शासकीय कोव्हीड सेंटरला वर्ग केला तर ते सेंटर पुर्ण क्षमतेने चालू होवू शकते त्यामुळे मोठी सोय होईल अशी मागणी डाॅ विलास मेहता यांनी केली आहे.


नगरपरिषद व ग्रामीण रुग्णालयांच्या माध्यमातुन नियमित पंचायत समिती येथे नागरिकांसाठी रॅपिड अँटिजन तपासणी शिबीर घेतले जात आहेत ज्या योगे कोरोना बाधित रुग्णांना वेळेत उपचार सुरू करता येऊ शकणार आहे.शहर व परिसरात मास्क व नियम सक्तीसाठी नगरपरिषदेने दंड आकारणी मोहिमहि सुरु केली असून कोरोनाच्या या लढ्यात नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.
 
Top