ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ई-कॉमर्स संस्थांसाठी नियम consumer protection act for e-comerce

नवी दिल्‍ली,PIB Mumbai,१८ सप्‍टेंबर २०२०-ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत अधिसूचित केलेल्या ग्राहक संरक्षण अधिनियम, 2020 नुसार, ई-कॉमर्स संस्थेची व्याख्या अशी आहे की एखादी व्यक्ती जिचा ई कॉमर्ससाठी स्वतःचा मंच आहे किंवा ती तो मंच चालविते किंवा त्याचे व्यवस्थापन करते परंतु या मंचावर विक्रीसाठी आपला माल ठेवणारा विक्रेता याअंतर्गत येत नाही.

ई-कॉमर्स नियमांच्या नियम 4(1) नुसार ई-कॉमर्स संस्था ही कंपनी कायदा 1956 (1 of 1956) किंवा कंपनी कायदा 2013 (18 of 2013) किंवा कंपनी कायदा 2013 (18 of 2013) च्या कलम (2) च्या खंड (42) नुसार परदेशी कंपनी समाविष्ट केलेली कंपनी असेल किंवा परदेशी विनिमय कायदा 1999 (42 of 1999) च्या कलम (2) च्या खंड (v) च्या उपखंड (iii) नुसार परदेशात कार्यालय, त्याची शाखा किंवा संस्थेचा मालक असलेला आणि त्याचे नियमन करणारा भारतीय रहिवासी असेल आणि कायद्यातील तरतुदी किंवा त्यातील नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी संपर्कातील एक नोडल व्यक्ती किंवा भारतातील व्यक्तीची नेमणूक करेल.

केंद्रीय ग्राहक व्यवहार,अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
 
Top