समीर कोळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसीविभाग जिल्हाध्यक्षपदी

पंढरपूर -माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे समर्थक समीर कोळी यांची पुन्हा सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसीविभाग जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .

मा.अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मान्यतेनुसार मा.खा.ताम्रध्वज साहू,अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार आणि आ.बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत ओबीसी विभाग कार्यरत आहे.

प्रमोद मोरे ,प्रदेशाध्यक्ष ,महाराष्ट्र काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले आहे.
 
Top