उद्याचा सूर्य 

काळोख्या वैराण वाळवंटात  
लढाई परिवर्तनाची जिद्दीने लढतो आहे 
विद्रोही सूर्योदय होण्यासाठी मी 
वर्तमान पिंजून काढतो आहे !!१!!

ना खंत मला व्यथा वेदनांची
प्रतिकूलतेतून ओझे मी वहातो आहे
ना फ़िकिर माझ्या सुख स्थैर्याची 
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहतो आहे !!२!!

ना आशा आकांक्षा सुख समृद्धीच्या 
दाह वेदनेचा सोसतो आहे 
ना चिंता मला माझ्या भविष्याची 
घेतलेला वसा जिद्दीने जोपासतो आहे !!३!!

ना काळजी मजला माझ्या परिवाराची मशाल परिवर्तनांची तेवत ठेवतो आहे 
ना भय मजला माझ्या जगण्याची 
जीवनावर तुळशीपत्र ठेऊन वाट चालतो आहे!!४!!

हजारो हात माझ्या साथीला लढताना 
सूर यशाचे आळवीतो आहे 
वंचितासाठी जीवन समर्पित करताना 
सार्थकता अनुभवतो आहे !!५!!

वळूनी पाहता पाठीशी जथ्था नव्या पिढिचा 
मशाल घेऊन येताना दिसतो आहे 
उद्याचा सूर्योदय परिवर्तनाचाच असणार 
हाच आत्मविश्वास आम्हा जागावतो आहे !!६!!

आनंद कोठडीया,९४०४६९२२००
वादळवाटमधून .....


 
Top