निगरगट्ट.......

ते खूप निगरगट्ट त्यांना कसलाही विधनिषेध नाही
भ्रष्टाचार शोषण दलाली यांचेशिवाय कारभार नाही !!१!!

कितीही ओरडले आवाज काढला तरीही ते त्यांचं सोडतच नाही
दिल्या घेतल्याशिवाय त्यांचे पानही हालत नाही !!२!!

सत्तेत पक्षात तेच वजनदार इतरांना वाव नाही
श्रेष्ठी व वारसदार यांचे ते पाळीव प्राणी ते दाद देतच नाही !!३!!

त्यांच्याशिवाय पान नव्हे हवाही हालत नाही
ते कोडगे इतरांचे ते कांहीच चालू देत नाही!!४!!

जात पैसा दहशत हीच विजयाची हत्यारे इतरांना उमेदवारी मिळतच नाही
सत्य सेवा पारदर्शकता त्यांना कांहीच देणंघेणं नाही !!५!!

आनंद कोठडीया ,जेऊर ९४०४६९२२००


 
Top