वादळं वारा :

माणूस बुद्धी असूनही स्थिर नाही
सुख धनात स्वार्थ मनांत
सेवा बोलण्यात कौशल्य भ्रष्टाचारात
राहणं झकास प्रत्यक्ष सारेच भकास
हा येथील व्यवहार आहे
जाईल तिथे दिसायला मोठ आहे
पण त्यांच विश्व मात्र खोटं आहे
श्रीमंत आकाशात श्रमिक मातीत हे चित्र आहे
हे पाहून पशू देखील लाजतो आहे
जो तो आपल्ल्या सुखासाठी
दुसऱ्याला पाणी पाजतो आहे 
आपण माणूस आहे हेच तो विसरतो आहे !!"

आनंद कोठडीया,९४०४६९२२००


 
Top