माय नेम इज टुडे ......
राजकारणातील वास्तव आहे.सर्व पक्ष सारखेच अनुभवास येत आहेत.
राजकारणात अश्वासनाचा पाऊस मोठा आहे
कोणीही असो सर्वांचा धंदा खोटा आहे !!१!!

कायद्याला मात्र फाटा आहे
सत्याला सर्वाँचाच टाटा आहे !!२!!

शासन व्यवस्था वांझोटी आहे
खुर्चीवर चोर जनतेच्या हाती लंगोटी आहे !!३!!

येथे लबाडान्चा मेळ आहे
लोकशाही निवडणुक पैशाचा खेळ आहे !!४!!

सत्ता उद्योगपतिंच्या दावणीला आहे
गरीब येथे फक्त मतदानापूरताच उरला आहे !!५!!

सज्जन सेवक सत्याग्रही मातीमोल आहे
लाचार बांडगूळ फक्त अनमोल आहे !!६!!

आनंद कोठडीया,९४०४६९२२००


 
Top