बोरामणी विमानतळाच्या उर्वरीत जागेच्या भू संपादनासाठी

सोलापूर - मंत्रालयामध्ये १५/०९/२०२० रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर येथील बोरामणी विमानतळाच्या उर्वरीत जागेच्या भू संपादनासाठी विशेष बाब म्हणून ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आणि ती रक्कम २ दिवसात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्व व्यापारी, उद्योगपती आणि नागरिकांच्यावतीने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.

त्यामुळे तो कत्तलखाना ताबडतोब बंद करण्याचे आदेश द्यावेत

विमानतळासाठीची संपूर्ण जागा अधिग्रहण करून त्या ठिकाणी विमानतळ उभा करण्यासाठी बराच कालावधी जाणार असून तोपर्यंत शासनाच्या उडान सेवेचा लाभ सोलापूरकरांना घेता येणार नाही.त्यासाठी बोरामणी येथील विमान तळ होईपर्यंत होडगी रोड येथील सुसज्ज अशा विमानतळावरून ही सेवा देण्यात यावी.बोरामणी तेथील विमानतळाला जे काही अडथळे असतील ते या दोन महिन्यात दूर करावेत जेणे करून विमानसेवा सुरळीतपणे चालू होईल.त्यामुळे सोलापुरात वेगवेगळे उद्योगधंदे प्राधान्याने येेतील . त्यामुळे जिल्ह्यातील तरुण वर्गाला काम मिळेल. जिल्ह्यातून रोजगारासाठी बाहेर जाणाऱ्या लोकांना जिल्ह्यातच काम उपलब्ध होईल आणि जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागेल. बोरामणी विमानतळ जवळच सोनांकूर एक्सपोर्ट्सच्या नावाने एक कत्तलखाना सुरू असून तेथून आता पर्यंत जवळपास आकरा लाख मोठी जनावरे कत्तल करून पाठवण्यात आलेली आहेत .विमान तळाच्या आसपास कत्तलखाने नसावेत कारण यासाठी एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया व डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एविएशनच्या नियमानुसार विमानतळाजवळ कत्तलखाना असल्यास प्रवासी विमानसेवेेेेेसाठी परवानगी मिळत नाही. त्यामुळे तो कत्तलखाना ताबडतोब बंद करण्याचे आदेश द्यावेत असे निवेदन सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यावतीने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले.


तसेच सोलापूर मध्यच्या आमदार कु.प्रणिती शिंदे यांचेही विमानतळाच्या उर्वरित जागा घेण्यासाठी साठी ५० कोटी रुपये मंजूर करून घेण्यासाठी मोठे योगदान होते त्याबद्दल चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे उपाध्यक्ष उपेंद्र ठाकर व मानद सचिव केतनभाई शहा यांच्या हस्ते बुके देऊन त्यांच्याही कार्यालयात सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार कु.प्रणिती शिंदें यांनी विमान तळासाठी पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले.
 
Top