विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे लिखित "समानतेकडून विकासाकडे" शाश्वत विकास उद्दिष्टांची ओळख आणि आव्हाने या पुस्तक वाचकांना लवकरच उपलब्ध होणार,
वाढदिवसाच्या औचित्य साधून ना.डॉ.गोऱ्हे यांनी या पुस्तकासंदर्भात केली घोषणा


महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ नीलम गोऱ्हे यांचे वाढदिवसाच्या अनुषंगाने कार्यकर्त्या बरोबर झूमद्वारे संवाद. कार्यकर्त्याच्या प्रेमाने डॉ गोऱ्हे झाल्या भावूक

     पुणे दि.१२/०९/२०२०,(डॉ अंकिता शहा ) - कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्यक्षात भेट शक्य नसल्याने ना.डॉ.निलमताई गोऱ्हे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स माध्यमातून कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. या उपक्रमाबद्दल ना.डॉ.गोऱ्हे यांचे या कॉन्फरन्समध्ये उपस्थित पत्रकारांनी आभार मानले. या कॉन्फरन्समध्ये शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, अनेक पक्षांचे कार्यकर्ते तसेच समाजामध्ये विविध स्तरावर काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी या सर्वांनी एकत्र येऊन डॉ नीलम गोऱ्हे ह्या नवीन महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपसभापती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.

ना.डॉ.गोऱ्हे यांनी पर्यावरण आणि शाश्वत विकास यावर उपसभापती या नात्याने अनेक कार्यशाळा, व्याख्याने, लेखन मोठ्या प्रमाणात केले आहे. यासर्व विषयांवर ना.डॉ.गोऱ्हे यांचे खूप सुंदर पुस्तक वाचकांच्या मदतीला येणार आहे.

"समानतेकडून विकासाकडे" शाश्वत विकास उद्दिष्टांची ओळख आणि आव्हाने हे या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकाची घोषणा ना.डॉ.गोऱ्हे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून घोषणा केली. हे पुस्तक लवकरच सर्व ठिकणी उपलब्ध होणार असल्याचे व्यवस्थापन व संयोजन देखील प्रकाशक बुकगंगा टीमच्या वतीने करण्यात येणार आहे. या पुस्तकाबद्दल सविस्तर माहिती ना.डॉ.गोऱ्हे लवकरच देणारा असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी बोलताना ना.डॉ.गोऱ्हे यांनी सर्वांचे आभार मानले व हे पद हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मिळाल्याचे सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राज्यातील अनेक समस्या समोर येत आहेत.या समस्या सोडवण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी यांच्याबरोबर झूम अथवा व्हिडीओ मीटिंग घेण्यात येऊन हे प्रश्न सोडवण्या साठी प्रयत्न करण्यात येतील.

पंढरपूर मंदिरासंदर्भात सहा महिन्यांपूर्वी विधान परिषद कार्यालयात पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांचे बरोबर सभा घेणेत अली होती. पंढरपूर देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी एक स्वतंत्र आराखडा तयार करण्याच्या सूचना त्या सभेत देणेत आल्या होत्या. त्यानुसार देवस्थानाने पुरातत्व विभागला रु २० लाख दिले व आजच पुरातत्व विभागाने पाहणी करून आराखडा करण्यास सुरुवात केली याचा आनंद आहे असेही डॉ गोऱ्हे म्हणाल्या.

ना.डॉ.गोऱ्हे यांनी आतापर्यंत आमदार निधीतून जवळपास ५० लाख रुपयांचे कोव्हिड-१९ साठी साहित्य खरेदी साठी दिला आहेत. यात रुग्णवाहिका तसेच पीपीई किट असे इतर साहित्य खरेदीसाठी निधी दिला होता. वाढदिवसाचे औचित्य साधून ना.डॉ.गोऱ्हे यांनी महाराष्ट्रातील विविध वाचनाल्यांना १० लक्ष निधी जाहीर केला आहे.

तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या भागातील प्रश्न देण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रश्नावर लवकरच व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबंधित अधिकारी यांच्या बैठका घेण्यात येतील आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपसभापती म्हणून नक्कीच प्रयत्न करेल असे देखील ना.डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

सर्वांच्या सहकार्यने लॉकडाऊन आणि कोव्हिडं- १९ च्या परिस्थिती लोकांना धान्य, तसेच त्यांचे विविध प्रश्न, रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्याचे मोठ्या प्रमाणात काम झाले असल्याचे या कॉन्फरन्स मध्ये कार्यकर्त्यांनी ना.डॉ.गोऱ्हे यांचे आभार मानले.

   दूरध्वनीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार श्रीरंग बारणे, खा.ओमराजे निंबाळकर, मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार यांच्यासह शिवसेना जिल्हा प्रमुख, विविध पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकत्यांनी शुभेच्छा दिल्या.
 
Top