भाऊसाहेब तालीम संघ व शिवप्रेमी ग्रुपच्यावतीने कासेगाव येथे रक्तदान शिबिर

  खर्डी,(संतोष कांबळे)-कासेगाव तालुका पंढरपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाने देश-विदेशात थैमान घातले असून या काळात रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. त्यासाठी भाऊसाहेब तालीम संघ व शिवप्रेमी ग्रुप यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबीरामधे ७१ रक्तदात्यांनी रक्तदान(blood donation camp) केले.  


    कासेगाव येथील भाऊसाहेब तालीम संघ व शिवप्रेमी ग्रुप यांच्यावतीने वारंवार रक्तदान शिबीर blood donation camp तसेच सामाजिक उपक्रम घेण्यात येतात.  

  पुढेही असे समाजोपयोगी कार्यक्रम करू असे या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अनिकेत धैर्यकांत देशमुख,सचिन देशमुख,रामराजे खुळे ,केतन देशमुख,विकास ढवळे, धनाजी कळकुंबे,ओंकार कोळी ,गणेश भूईटे ,सागर माने,प्रकाश डूणे  व अनिकेत देशमुख मित्र परिवार यांनी प्रयत्न केले .
 
Top