आजच वास्तव......

आता साने गुरुजी नाहीत
आता उरलेत ते पगारी वेठबिगार,संधीसाधू
अन जे खरच चांगले शिक्षक आहेत
ते जागेवरच कुजत आहेत 
अधिकारी नेत्यांच्या घरी पाणी भरत आहेत 
बदल्या म्हणजे भ्रष्टाचाराची शस्त्रे झाली आहेत 
आता कसं,? नेते म्हणतील तसं
अधिकारी मागतील तसं
शाळा आहे, खडू आहे, पण शिक्षण नाही 
हे सारं विलक्षण आहे 
शाळेत जाऊन देखील पोरं निरक्षर आहेत
सरकारी अहवाल वास्तव सांगूनही सर्वत्र
हे असेच चालणार असं शिक्षकच बोलत आहेत !!

 जीवनावर एक भाष्य :

"आपल्या जीवनाच गणित कसं सोडवायच 
ज्याच त्याने ठरवाव हे खरे पण 
असं जगावं की इतरांच जगणं सोपं व्हावं 
सृष्टीला फूलवाव सुखाचे सोबती 
सतत मिळवत जावं जेवढी माणसं 
जोड़ता येतील तेवढी सतत जोडत रहावं 
आनंदाची मशागत करत मानवतेच पीक घ्यावं 
सार्थक करावं ,माणसांची दौलत पाहून 
दगडातील देवांनीही लाजाव 
गेल्यावरही आपलं नांव निघाव
आपलं जीवन एक प्रेरणा होतं जावं !!

आनंद कोठडीया,९४०४६९२२००  
Top